Local Residents Confront Pollution Officials
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना कोंडल्याचं समोर आलंय.
ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना सहा तास कोंडून ठेवलेलं होतं.
कोल्हापूरच्या अर्जुनवाडचे ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
नदी प्रदूषणाकडे दुर्लक्ष करत असल्यानं या अधिकाऱ्यांना डांबून ठेवण्यात आलं.
कोल्हापूर जिल्ह्यात नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनत चाललेला आहे.
नदी प्रदूषणाकडे लक्ष न दिल्यानं कोल्हापूर प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना कोंडून ठेवलेलं आहे.
तर कोल्हापूरमधून महत्त्वाची बातमी. कोल्हापूर प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना कोंडलेलं आहे.
ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना सहा तास कोंडून ठेवलं.
कोल्हापूरच्या अर्जुनवाडचे ग्रामस्थ आक्रमक झाले.
नदी प्रदूषणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत या अधिकाऱ्यांना डांबून ठेवण्यात आलं.
[पार्श्वभूमीवरील आवाज]
आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्यासोबत आहेत.
प्रताप, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना डांबून ठेवण्यात आलेलं होतं.
त्यानंतर कशाप्रकारे हे वातावरण निवळलेलं आहे? कशाप्रकारे ग्रामस्थांची समजूत काढण्यात आली?
आपण पाहतोय की पंचगंगेच्या उगमापासून ते संगमापर्यंत अनेक भागात
जे नदी गावं आहेत किंवा शहरं आहेत, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतंय.
तशाच प्रकारचा जे काही प्रदूषण आहे ते अर्जुनवाड नदीच्या परिसरात झाल्याचं पाहायला मिळालं.
या संदर्भात वारंवार ग्रामस्थांनी आक्षेप नोंदवला, या संदर्भात पत्र दिली,
तरी देखील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सॅम्पल घेण्याशिवाय दुसरा कुठलाही त्या ठिकाणी कारवाई केली नाही.
त्यामुळेच आपण पाहतोय की चिडलेल्या ग्रामस्थांनी ॲक्वाटेक इंडस्ट्रीमधलं जे पाणी येतंय,
नदीत जातंय, त्याच्या विरोधात या ठिकाणी आपण पाहतोय की अधिकाऱ्यांना तब्बल सहा तास कोंडून घातलेला आहे.
सध्या त्या अधिकाऱ्याला सोडण्यात आलेलं आहे.
पण एकूणच आपण पाहतोय की अशा प्रकारची घटना यापूर्वी सुद्धा या भागात घडलेली होती. काही अधिकाऱ्यांना बांधून घातलं होतं.
खरं तर आपण पाहतोय की प्रदूषण नियंत्रण मंडळाचं कामच आहे
की ज्या ज्या प्रदूषित घटक आहेत त्यांच्यावर कारवाई करायचं. पण कारवाईचा बडगा न उगारता...
...फक्त सॅम्पल घेतलं जातं आणि त्यानंतर कुठल्या प्रकारची कारवाई केली जात नाही.
त्यामुळेच आपण पाहतोय की ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय.
नक्कीच प्रताप, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.
End of transcript · 286 words