Political Commentary on Hindutva and Elections

नाही ती प्रत्येकाने जोपासली पाहिजे.

हिंदुत्वाचा तुम्ही प्रचार करणार का? अरे बाबा हा राज्याचा प्रश्न आहे.

लोकसभेला ज्यावेळेला आमचे कुणी उभे राहतील त्यावेळेला हिंदुत्वाचा प्रचार का?

तर तो देशाचा प्रश्न आहे म्हणून.

महाराष्ट्रावरती संकट आल्यानंतर महाराष्ट्राच्या संबंधांचा प्रश्न आणि

देशावरती संकट आल्यानंतर मात्र देशाचा विचार हे शिवसेनेचं स्पष्ट धोरण आहे.

निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला शाहू महाराज आठवतात.

निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला ज्योतिबा फुले आठवतात.

निवडणुकीच्या तोंडावर डॉक्टर आंबेडकर आठवतात. एरवी कोणीही कोणाला विचारत नाही.

पुसतही नाही आणि आठवणही येत नाही आणि पुतळाही बसत नाही.

बहुजन समाजाच्या बाबतीत मला तुम्ही सांगू नका.

माझ्या बापाने त्याकरता खस्ता खाल्लेल्या आहेत बहुजन समाजाच्या हितासाठी.

पुण्यामध्ये आमच्या घरावरती शेणमार झालेली आहे.

पुण्याला आमच्या घरासमोर मेलेले गाढव टाकलेले आहे.

पुण्याला आमच्या वडिलांच्या प्रेतयात्रा काढलेल्या आहेत जिवंतपणी हे मी

पाहिलेलं आहे. त्या बालवयामध्ये पाहिलेलं आहे.

हिंदुस्थानामध्ये आम्ही हिंदू आहोत आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही मराठी आहोत.

गुजरातमध्ये तुम्ही गुजराती असाल पण महाराष्ट्रामध्ये सोडून द्या.

गुजरातमध्ये तुम्ही गुजराती आहात आणि संपूर्ण देशामध्ये तुम्ही हिंदू आहात.

बंगालमध्ये तुम्ही बंगाली असाल

पण हिंदुस्थानामध्ये तुम्ही हिंदू आहात.

ही हिंदू भूमिका घेतल्याशिवाय तुम्हाला जगता येणार नाही आणि हे

येणारं हिरवं सावट

येणारं हिरवं संकट तुम्हाला ते परतही करता येणार नाही.

End of transcript · 184 words

iPhone app Translate videos on your iPhone Paste a TikTok, Instagram or X link, add subtitles in your language and save the video to Photos.

Read any video in your language

Paste a link from X, TikTok, YouTube or Instagram. You get a page like this one.

© 2026 TranslateMom Transcripts Sources Pricing Legal