Spiritual Teachings and Symbolism
शरीरावरती जे काही चिन्ह आलेत त्याला आपण विश्वरूप दर्शन असं म्हणतो.
गुरुजी ते आपल्याला सर्व चिन्ह सांगत आहेत. आपण सर्वांनी इकडे लक्ष द्या.
भक्त पुंडलिकाने दिलेली वीट आहे.
ती वीट आहे. त्या विटेवरती देव उभा आहे.
मुक्तकेशी नावाची दासी होती. त्या रूपाने नाजूक होत्या,
त्यांना नाजूक असल्याचा गर्व होता.
ज्यावेळेस या ठिकाणी देवाच्या दर्शनाला आल्या,
त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये असा भाव निर्माण झाला की
मी देवाच्या पायावरती डोकं कसं टेकवू.
त्यांनी देवाच्या पायावरती दर्शन न घेता
करंगळी शेजारचं बोट या ठिकाणी लावलेलं आहे डाव्या पायाला.
या ठिकाणी बोट उठलेलं आहे आणि त्यांचा गर्व हरण झालेला आहे.
ही कृष्ण अवतारातील गोराख्याची काठी आहे.
पितांबराचा सोगा आहे. डाव्या हातामध्ये शंख आहे.
उजव्या हातामध्ये कमलपुष्प आहे. कमरेला वासनीवेळाचा कडदोरा.
अर्धांगी रुक्मिणी मातेला बसण्यासाठी दिलेली जागा आहे.
ब्रह्मदेवाचे जन्मस्थान नाभीकमल.
भृगू ऋषींनी लाथ मारली भृगूलांछन.
गळ्यामध्ये कौस्तुभ मणी आहे. मकराकार कुंडले आहेत.
शिवाकार मस्तक आहे.
पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज की जय!
End of transcript · 151 words