0:00

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना कोंडल्याचं समोर आलंय.

0:04

ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना सहा तास कोंडून ठेवलेलं होतं.

0:07

कोल्हापूरच्या अर्जुनवाडचे ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

0:11

नदी प्रदूषणाकडे दुर्लक्ष करत असल्यानं या अधिकाऱ्यांना डांबून ठेवण्यात आलं.

0:15

कोल्हापूर जिल्ह्यात नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनत चाललेला आहे.

0:20

नदी प्रदूषणाकडे लक्ष न दिल्यानं कोल्हापूर प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना कोंडून ठेवलेलं आहे.

0:30

तर कोल्हापूरमधून महत्त्वाची बातमी. कोल्हापूर प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना कोंडलेलं आहे.

0:34

ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना सहा तास कोंडून ठेवलं.

0:38

कोल्हापूरच्या अर्जुनवाडचे ग्रामस्थ आक्रमक झाले.

0:42

नदी प्रदूषणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत या अधिकाऱ्यांना डांबून ठेवण्यात आलं.

0:46

[पार्श्वभूमीवरील आवाज] आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्यासोबत आहेत.

0:57

प्रताप, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना डांबून ठेवण्यात आलेलं होतं.

1:01

त्यानंतर कशाप्रकारे हे वातावरण निवळलेलं आहे? कशाप्रकारे ग्रामस्थांची समजूत काढण्यात आली?

1:06

आपण पाहतोय की पंचगंगेच्या उगमापासून ते संगमापर्यंत अनेक भागात जे नदी गावं आहेत किंवा शहरं आहेत, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतंय.

1:16

तशाच प्रकारचा जे काही प्रदूषण आहे ते अर्जुनवाड नदीच्या परिसरात झाल्याचं पाहायला मिळालं.

1:22

या संदर्भात वारंवार ग्रामस्थांनी आक्षेप नोंदवला, या संदर्भात पत्र दिली, तरी देखील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सॅम्पल घेण्याशिवाय दुसरा कुठलाही त्या ठिकाणी कारवाई केली नाही.

1:33

त्यामुळेच आपण पाहतोय की चिडलेल्या ग्रामस्थांनी ॲक्वाटेक इंडस्ट्रीमधलं जे पाणी येतंय, नदीत जातंय, त्याच्या विरोधात या ठिकाणी आपण पाहतोय की अधिकाऱ्यांना तब्बल सहा तास कोंडून घातलेला आहे.

1:43

सध्या त्या अधिकाऱ्याला सोडण्यात आलेलं आहे.

1:48

पण एकूणच आपण पाहतोय की अशा प्रकारची घटना यापूर्वी सुद्धा या भागात घडलेली होती. काही अधिकाऱ्यांना बांधून घातलं होतं.

1:53

खरं तर आपण पाहतोय की प्रदूषण नियंत्रण मंडळाचं कामच आहे की ज्या ज्या प्रदूषित घटक आहेत त्यांच्यावर कारवाई करायचं. पण कारवाईचा बडगा न उगारता...

2:01

...फक्त सॅम्पल घेतलं जातं आणि त्यानंतर कुठल्या प्रकारची कारवाई केली जात नाही.

2:06

त्यामुळेच आपण पाहतोय की ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय.

2:11

नक्कीच प्रताप, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.

End of transcript · 286 words

iPhone app Translate videos on your iPhone Paste a TikTok, Instagram or X link, add subtitles in your language and save the video to Photos.

Made with TranslateMom

TranslateMom transcribes and translates videos from X, TikTok, YouTube and Instagram. Paste a link and you get a page like this one, in your language.

Transcribed with TranslateMom. Paste any video link to get subtitles and a transcript in your language.

© 2026 TranslateMom · AI video translation and subtitles Transcripts Sources Pricing Legal